माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना काँग्रेसतर्फे अभिवादन

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : भारतातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे जनक, देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पैठण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष तथा नगरसेवक हसनोद्दीन कट्यारे यांच्या नेहरू चौक येथील जनसंपर्क कार्यालयात उत्साहात झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या देशाप्रती असलेल्या ऐतिहासिक
योगदानाचे आले. स्मरण करण्यात यावेळी उपस्थितांनी राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात सुरू झालेल्या डिजिटल व दूरसंचार क्रांतीवर प्रकाश टाकला. 

या अभिवादन कार्यक्रमास पैठण शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष हसनोद्दीन कट्यारे यांच्यासह माजी नगराध्यक्ष अंबादास ढवळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश निवारे, इम्रान पठाण, नगरसेवक स्वप्निल साळवे, रियाज गादी, नगरसेवक अज्जू कट्यारे, राजा कुरेशी, राकेश लोंढे, आयुब आंबेकर, अमन काझी, हनीफ, बाबामिया कुरेशी, युसुफ बीवन, फिरोज उस्मान कुरेशी, अनिस कुरेशी, अशोक गवळी, इरफान गिराम, मनीष भुसारे, शेख पाशा, कलीम शेख, सय्यद जुबेर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.